फोटो सौजन्य: @HitchcocksM/X.com
रॉयल एनफील्डने पुण्यात आयोजित GRRR Nights X Underground इव्हेंटदरम्यान आपल्या लोकप्रिय गुरिल्ला 450 बाईकचा नवा शॅडो ऍश कलर सादर केला आहे. हा खास कलर केवळ Dash व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. या व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 2.49 लाख ठेवण्यात आली आहे. या बाईकमध्ये ब्लॅक-आऊट डिटेलिंगसह ऑलिव्ह-ग्रीन रंगाचा फ्युएल टँक दिला असून तिचा लूक अधिक स्पोर्टी आणि आकर्षक बनवण्यात आला आहे.
गुरिल्ला 450 मध्ये तेच दमदार Sherpa 450 इंजिन वापरण्यात आले आहे, जे रॉयल एनफील्डच्या हिमालयन 450 मध्येही मिळते. हे 452cc क्षमतेचे, सिंगल-सिलिंडर, लिक्विड-कूल्ड इंजिन असून ते 39.52 bhp पॉवर आणि 40 Nm टॉर्क निर्माण करते. या इंजिनसोबत 6-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे, ज्यामध्ये स्लिप-अँड-असिस्ट क्लच आहे. कंपनीने गुरिल्ला 450 साठी वेगळी स्पेशल इंजिन मॅपिंग विकसित केली आहे, ज्यामुळे रायडिंगचा अनुभव अधिक स्मूथ आणि दमदार होतो.
ही बाईक प्रामुख्याने फास्ट रायडिंगसाठी डिझाइन केली गेली आहे. इंजिन सहजतेने रेडलाइनपर्यंत पोहोचते, ज्यामुळे परफॉर्मन्स अधिक प्रभावी वाटतो. रायडिंगदरम्यान हलके व्हायब्रेशन जाणवतात, परंतु तेच या बाईकच्या कॅरेक्टरला अधिक खास बनवतात. गिअरबॉक्स अत्यंत स्मूद आहे आणि क्लच हलका असल्यामुळे शहरात व लांब पल्ल्याच्या प्रवासातही चालवायला सोपी आहे.
फीचर्सच्या यादीकडे पाहिल्यास, बाईकमध्ये USB चार्जिंग पोर्ट, हॅझर्ड लाईट, दोन रायडिंग मोड्स, पूर्ण LED लाइटिंग आणि राइड-बाय-वायर टेक्नॉलॉजी सारख्या आधुनिक सुविधा दिल्या आहेत. या सर्व फिचर्समुळे गुरिल्ला 450 तिच्या सेगमेंटमध्ये अधिक प्रीमियम ठरते.
या बाईकमध्ये दिलेले इन्स्ट्रुमेंट क्लस्टर पूर्णपणे डिजिटल आहे आणि त्यामध्ये Google Maps कंपॅटिबिलिटी मिळते. हे फिचर लांब प्रवास करणाऱ्या रायडर्ससाठी अत्यंत उपयोगी ठरते. अगदी Shotgun 650 आणि Super Meteor 650 प्रमाणे त्याच्या लोअर व्हेरिएंटमध्ये अनालॉग क्लस्टरसह डिजिटल डिस्प्ले आणि ट्रिपर पॉड देण्यात आला आहे.
गुरिल्ला 450 मध्ये ट्युबलर फ्रेम वापरण्यात आली आहे, ज्यामध्ये इंजिन स्ट्रेस्ड मेंबर म्हणून कार्य करते. सस्पेन्शनच्या बाबतीत पुढे 43mm टेलीस्कोपिक फोर्क्स तर मागे मोनोशॉक देण्यात आला आहे. पुढच्या बाजूस 140 mm आणि मागच्या बाजूस 150 mm ट्रॅव्हल मिळते, ज्यामुळे ऑफ-रोड आणि ऑन-रोड रायडिंग दोन्ही अनुभव अधिक आरामदायक होतात.
ब्रेकिंगसाठी समोर 310 mm डिस्क आणि मागे 270 mm डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत. तसेच, या बाईकमध्ये 17 इंच अलॉय व्हील्स असून त्यावर 120/70 आणि 160/60 आकाराचे टायर्स बसवले आहेत. यामुळे रायडिंगदरम्यान स्थिरता आणि नियंत्रण अधिक चांगले मिळते.