Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recipe : कुरकुरीत नूडल्स, आंबट-गोड सॉस आणि भरपूर भाज्या; रेस्टाॅरंट स्टाईल ‘अमेरिकन चाॅप्सी’ची रेसिपी नोट करा

American Chop Suey Recipe : तुम्ही कधी अमेरिकन चाॅप्सी ही डिश ट्राय केली आहे का? कुरकुरीत नूडल्स, त्यावर गरमा गरम भाज्यांचे सूप आणि शेवटी एक ऑम्लेट... या सर्वांचीच चव मनाला सुखद आनंद देऊन जाते. पावासाळ्याच्या थंड वातावरणात तुम्ही ही गरमा गरम डिश घरी ट्राय करु शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 03, 2026 | 09:30 AM
Recipe : कुरकुरीत नूडल्स, आंबट-गोड सॉस आणि भरपूर भाज्या; रेस्टाॅरंट स्टाईल 'अमेरिकन चाॅप्सी'ची रेसिपी नोट करा

Recipe : कुरकुरीत नूडल्स, आंबट-गोड सॉस आणि भरपूर भाज्या; रेस्टाॅरंट स्टाईल 'अमेरिकन चाॅप्सी'ची रेसिपी नोट करा

Follow Us
Follow Us:
  • अमेरिकन चाॅप्सी हा एक लोकप्रिय इंडो चायनिजचा प्रकार आहे.
  • चायनीज फूड लव्हर्स असाल ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल.
  • खास प्रसंगी तुम्ही ही रेसिपी घरी बनवू शकता.
भारतीय-चायनीज खाद्यसंस्कृतीमध्ये अमेरिकन चॉप सुई हा एक अतिशय लोकप्रिय आणि आकर्षक पदार्थ मानला जातो. हॉटेलमध्ये मिळणाऱ्या या डिशची चव आणि सादरीकरण इतके खास असते की अनेकांना ती घरी बनवणे अवघड वाटते. मात्र योग्य प्रमाणात साहित्य वापरून आणि काही सोप्या पद्धती अवलंबून अगदी हॉटेलसारखी अमेरिकन चॉप सी घरच्या घरी सहज तयार करता येते.

Monsoon Special Recipe : संध्याकाळच्या नाश्त्याला घरी बनवा कुरकरील आणि मसालेदार ‘ब्रेड पकोडा’

कुरकुरीत नूडल्स, मऊ शिजलेल्या भाज्या आणि घट्ट, चविष्ट सॉस यांचा प्रत्येक घास वेगळी चव अनुभवायला लावतो. वाढदिवस, संध्याकाळचा नाश्ता किंवा विकेंड स्पेशल मेनूसाठी हा पदार्थ उत्तम पर्याय ठरतो. आपल्या आवडीनुसार त्यात पनीर, मशरूम, चिकन किंवा प्रॉन्सदेखील घालता येते. चला रेसिपी जाणून घेऊया.

साहित्य

  • २०० ग्रॅम हक्का नूडल्स
  • २ टेबलस्पून कॉर्नफ्लोअर
  • तळण्यासाठी तेल
  • १ कप कोबी (बारीक चिरलेला)
  • १ गाजर (लांब कापलेले)
  • १ सिमला मिरची (बारीक चिरलेली)
  • १ कांदा (पातळ कापलेला)
  • १/४ कप फरसबी (चिरलेली)
  • १ टेबलस्पून लसूण (बारीक चिरलेला)
  • १ टीस्पून आले (बारीक चिरलेले)
  • २ टेबलस्पून टोमॅटो केचप
  • १ टेबलस्पून चिली सॉस
  • १ टीस्पून सोया सॉस
  • १ टीस्पून व्हिनेगर
  • १ टेबलस्पून साखर
  • चवीनुसार मीठ
  • १/२ टीस्पून काळी मिरी पूड
  • १ टेबलस्पून कॉर्नफ्लोअर (पाण्यात मिसळून)
  • २ कप पाणी किंवा व्हेजिटेबल स्टॉक
  • वरून सजावटीसाठी स्प्रिंग ऑनियन
  • इच्छेनुसार तळलेले अंडे
घरी आलेल्या पाहुण्याच्या स्वगतासाठी बनवा मऊ, लुसलुशीत तोंडात विरघळणारे रताळ्याचे गुलाबजाम, नोट करुन घ्या रेसिपी

कृती

  • नूडल्स पॅकेटवरील सूचनांप्रमाणे उकळून घ्या. त्यातील पाणी पूर्णपणे काढून त्यात २ टेबलस्पून कॉर्नफ्लोअर हलकेच मिसळा.
  • कढईत तेल गरम करून नूडल्सचे छोटे भाग करून सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. अतिरिक्त तेल निघण्यासाठी टिश्यू पेपरवर ठेवा.
  • दुसऱ्या पॅनमध्ये २ टेबलस्पून तेल गरम करून त्यात लसूण आणि आले परतून घ्या.
  • त्यानंतर कांदा, गाजर, फरसबी, कोबी आणि सिमला मिरची घालून मोठ्या आचेवर २ ते ३ मिनिटे परता. भाज्या किंचित कुरकुरीत राहू द्या.
  • आता त्यात टोमॅटो केचप, चिली सॉस, सोया सॉस, व्हिनेगर, साखर, मीठ आणि काळी मिरी पूड घालून चांगले मिसळा.
    त्यात पाणी किंवा व्हेजिटेबल स्टॉक घालून मिश्रणाला उकळी आणा. नंतर कॉर्नफ्लोअरचे पाण्यातील मिश्रण घालून सॉस हलवत राहा. सॉस घट्ट होईपर्यंत शिजवा.
  • सर्व्हिंग प्लेटमध्ये कुरकुरीत तळलेले नूडल्स ठेवा. त्यावर गरमागरम भाज्यांचा सॉस समान पसरवा. इच्छेनुसार वर तळलेले अंडे ठेवा.
  • शेवटी स्प्रिंग ऑनियनने सजावट करून लगेच गरमागरम सर्व्ह करा.

Web Title: How to make american chop suey at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2026 | 09:30 AM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

तोंडात टाकताच विरघळेल! दुधाचा वापर करून बनवा रिच आणि क्रीमी केशर पिस्ता मिल्क केक, नोट करा रेसिपी
1

तोंडात टाकताच विरघळेल! दुधाचा वापर करून बनवा रिच आणि क्रीमी केशर पिस्ता मिल्क केक, नोट करा रेसिपी

Shravan Somvar : श्रावणी सोमवारासाठी खास, भगवान शंकराला पूजेत अर्पण करण्यासाठी बनवा ‘बेसनाची बर्फी’
2

Shravan Somvar : श्रावणी सोमवारासाठी खास, भगवान शंकराला पूजेत अर्पण करण्यासाठी बनवा ‘बेसनाची बर्फी’

वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा कुरकुरीत मसूर डाळीचा डोसा, नोट करून घ्या रेसिपी
3

वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा कुरकुरीत मसूर डाळीचा डोसा, नोट करून घ्या रेसिपी

नारळी पौर्णिमेनिमित्त आगरी पद्धतीने बनवा खमंग चविष्ट नारळी भात, पदार्थ खाल्ल्यानंतर सगळेच करतील गोड कौतुक
4

नारळी पौर्णिमेनिमित्त आगरी पद्धतीने बनवा खमंग चविष्ट नारळी भात, पदार्थ खाल्ल्यानंतर सगळेच करतील गोड कौतुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.