Bread Pakora Recipe : पावासाच्या थंड वातावरणात संध्याकाळी कोणत्या गरमा गरमा नाश्त्याच्या शोधात असाल तर ब्रेड पकोडा तुमच्यासाठी परफेक्ट पर्याय ठरेल. या दिवसांत विकतचे अन्न आरोग्य बिघडवू शकते, अशात घरीच टेस्टी पदार्थ बनवून खा.
(फोटो सौजन्य: Pinterest)
Follow Us:
Follow Us:
विस्तार
पावासाळ्यात गरमा गरम पदार्थ खाण्याची मजाच न्यारी.
ब्रेड पकोडा चवीला फार छान लागतो आणि तो सर्वांच्याच आवडीचा पदार्थ आहे.
बाहेरचे पदार्थ या सीजनमध्ये खाऊ नका, तर त्यांना घरीच बनवा.
पावसाळा असो, संध्याकाळचा चहाचा वेळ असो किंवा घरी अचानक पाहुणे आले असोत, झटपट तयार होणाऱ्या आणि सर्वांच्या आवडीच्या पदार्थांमध्ये ब्रेड पकोड्याचे नाव नेहमीच अग्रस्थानी असते. बाहेरून खुसखुशीत आणि आतून मऊ असा हा स्वादिष्ट नाश्ता लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो. ब्रेड पकोडा बनवण्यासाठी फारसे साहित्य लागत नाही. घरात सहज उपलब्ध असणाऱ्या ब्रेड, बेसन आणि काही मसाल्यांच्या मदतीने काही मिनिटांत हा पदार्थ तयार होतो. अनेक ठिकाणी यामध्ये मसालेदार बटाट्याचे सारण भरूनही ब्रेड पकोडा बनवला जातो, तर काहीजण साधा ब्रेड पकोडा अधिक पसंत करतात. गरमागरम हिरवी चटणी, टोमॅटो सॉस किंवा गोड चिंचेच्या चटणीसोबत याची चव आणखी खुलून येते. चला घरीच चवदार चवीचे ब्रेड पकोडे कसे बनवायचे याची रेसिपीजाणून घ्या.