घरी आलेल्या पाहुण्याच्या स्वगतासाठी बनवा मऊ, लुसलुशीत तोंडात विरघळणारे रताळ्याचे गुलाबजाम
जेवणाच्या ताटात प्रत्येकाला काहींना काही गोड पदार्थ खाण्याची इच्छा होते. मिठाई, साखर किंवा चाॅकलेट इत्यादी पदार्थ विकत आणून खाल्लेले जातात. पण नेहमीच तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर नवीन पदार्थ सगळ्यांच खाऊसा वाटतो. अशावेळी तुम्ही मऊ, लुसलुशीत तोंडात विरघळणारे रताळ्याचे गुलाबजाम बनवून खाऊ शकता. उपावासाच्या दिवशी अतिशय आवडीने रताळी खाल्ली जातात. रताळ्यामध्ये विटामिन सी, विटामिन सी, फायबर आणि पोटॅशियम मुबलक प्रमाणात आढळून येते. त्यामुळे आहारात रताळ्यांचा समावेश करावा. शरीराची कमकुवत झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी आहारात रताळ्यांचा समावेश करावा. रताळ्यामध्ये आढळणारे विटामिन ए डोळ्यांचे रक्षण करते आणि दृष्टी सुधारण्यास मदत करते.त्यामुळे कोणताही गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास रताळ्याचे गुलाबजाम नक्की बनवून पाहावे. हे गुलाबजाम आठवडाभर व्यवस्थित टिकून राहतात आणि लवकर खराब होत नाहीत. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
Monsoon Special Recipe : संध्याकाळच्या नाश्त्याला घरी बनवा कुरकरील आणि मसालेदार ‘ब्रेड पकोडा’






