Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हेल्दी आणि टेस्टी, यंदा कैरीचं नाही तर घरी बनवा आवळ्याचं चटकदार लोणचं, रेसिपी आहे फार सोपी

Amla Achar Recipe : आवळ्याचे शरीराला अनेक फायदे होतात. तुम्हाला जर आवळा खायला आवडत नसेल तर तुम्ही यापासून चटकदार चवीचं लोणचं तयार करु शकता. याची चव जेवणाची मजा दुपटीने वाढवेल.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 30, 2026 | 03:30 PM
हेल्दी आणि टेस्टी, यंदा कैरीचं नाही तर घरी बनवा आवळ्याचं चटकदार लोणचं, रेसिपी आहे फार सोपी

हेल्दी आणि टेस्टी, यंदा कैरीचं नाही तर घरी बनवा आवळ्याचं चटकदार लोणचं, रेसिपी आहे फार सोपी

Follow Us
Follow Us:
  • आवळा हा व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि लोहाचा उत्तम स्त्रोत आहे.
  • तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही आवळ्यापासून टेस्टी लोणचं बनवू शकता.
  • चला आवळ्याच्या लोणच्याची रेसिपी जाणून घेऊया.
भारतीय स्वयंपाकात लोणच्याला विशेष स्थान आहे आणि त्यातही आवळ्याचं लोणचं हे चव आणि आरोग्याचा सुंदर संगम मानलं जातं. आवळा हा व्हिटॅमिन C ने भरलेला असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतो. थोडासा आंबट, किंचित कडसर आणि मसाल्यांच्या मिश्रणामुळे तयार होणारं हे लोणचं जेवणाची चव अनेक पटींनी वाढवतं.

मासे प्रेमींसाठी खास! तंदुरशिवाय घरी बनवा स्मोकी आणि मसालेदार ‘तंदूर प्रॉन्स’, चव जी नेहमीच लक्षात राहिल…

पारंपरिक पद्धतीने बनवलं जाणारं आवळ्याचं लोणचं दीर्घकाळ टिकतं आणि प्रत्येक घासाला एक वेगळीच चव देते. घरच्या घरी बनवलेलं लोणचं केवळ चविष्टच नाही तर सुरक्षित आणि आरोग्यदायीही असतं. कमी साहित्य आणि सोप्या प्रक्रियेमुळे हे लोणचं सहज तयार करता येतं, त्यामुळे रोजच्या जेवणात एक खास टच मिळतो. चला नोट करून घेऊयात रेसिपीसाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य

  • ५०० ग्रॅम आवळे
  • ३ टेबलस्पून मोहरी
  • २ टेबलस्पून मेथी दाणे
  • २ टीस्पून हळद
  • २ टेबलस्पून लाल तिखट
  • ३ टेबलस्पून मीठ (चवीनुसार)
  • १/२ कप तेल (साधारण मोहरीचं किंवा रिफाइंड)
  • १ टीस्पून हिंग
Summer Drink: उन्हाळ्यात शरीरात वाढलेला थकवा क्षणात होईल दूर! १० मिनिटांमध्ये बनवा चटपटीत कोकम मॉकटेल

कृती

  • सर्वप्रथम आवळे स्वच्छ धुऊन कुकरमध्ये १ शिट्टी येईपर्यंत वाफवून घ्या.
  • नंतर थंड झाल्यावर त्यांच्या फोडी वेगळ्या करा आणि बिया काढून टाका.
  • कढईत मेथी दाणे आणि मोहरी हलक्या आचेवर भाजून घ्या. थंड झाल्यावर जाडसर वाटून घ्या.
  • एका मोठ्या भांड्यात आवळ्याच्या फोडी, हळद, लाल तिखट, मीठ आणि तयार केलेला मसाला घालून चांगले मिक्स करा.
  • कढईत तेल गरम करून त्यात हिंग घाला आणि हे गरम तेल आवळ्याच्या मिश्रणावर ओता. सगळं नीट एकत्र करून थंड होऊ द्या.
  • तयार लोणचं स्वच्छ आणि कोरड्या बरणीत भरून ठेवा.
  • २–३ दिवसांनी मसाले छान मुरल्यावर लोणचं खाण्यास तयार होतं.
 

Web Title: How to make amla achar at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 30, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • amla benefits
  • easy food recipes
  • marathi recipe

संबंधित बातम्या

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव
1

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी
2

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी
3

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
4

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.