
सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा हेल्दी टेस्टी ॲव्होकॅडो टोस्ट
सकाळच्या नाश्त्यात सगळ्यांचं हेल्दी आणि टेस्टी पदार्थ खाण्याची इच्छा होते. नेहमीच कांदापोहे, उपमा, शिरा किंवा आप्पे खाऊन कंटाळा आल्यानंतर हेल्दी नाश्ता हवा असतो. अशावेळी अनेकदा नाश्त्यात बाहेरून विकत आणलेले पदार्थ खाल्ले जातात. पण बाहेरचे आणि तेलकट पदार्थ खाल्ले जातात. मात्र नेहमी नेहमी तेलकट किंवा तिखट पदार्थ आरोग्यासाठी फायदेशीर नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये ॲव्होकॅडो टोस्ट बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. वाढलेले वजन कमी करताना अनेक लोक सकाळचा नाश्ता करणे टाळतात, मात्र असे केल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. सकाळचा नाश्ता करणे टाळल्यामुळे वाढलेले वजन कमी होण्याऐवजी वजन आणखीनच वाढू लागते. त्यामुळे नाश्त्यात तुम्ही ॲव्होकॅडो टोस्ट खाऊ शकता. ॲव्होकॅडो खाणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. चला तर जाणून घेऊया ॲव्होकॅडो टोस्ट बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
केळी खायला आवडत नाहीत? मग सोप्या पद्धतीमध्ये केळ्यांपासून बनवा तिखट गोड कोशिंबीर, चव लागेल सुंदर