चैत्र नवरात्रीच्या उपवासात शरीरातील ऊर्जा कायम टिकून राहण्यासाठी घरी बनवा हेल्दी ड्रायफ्रूट शेक
चैत्र नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये अनेक महिला उपवास करतात. उपवासाच्या दिवशी दिवसभरात कोणत्याही तेलकट तिखट पदार्थांचे सेवन केले जात नाही. या दिवशी फळे, दही किंवा पचनास हलक्या असलेल्या पदार्थांचे सेवन केले जाते. त्यामुळे काहीवेळा शरीरातील ऊर्जा कमी होऊन थकवा, अशक्तपणा जाणवू लागतो. याशिवाय काहींना वारंवार चक्कर येऊ लागते. त्यामुळे उपवासाच्या दिवशी शरीरास पचन होणाऱ्या आणि दीर्घकाळ ऊर्जा टिकवून ठेवणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. उपवासाच्या दिवस संपूर्ण दिवशी संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहामध्ये घालवण्यासाठी आहारात फळे, उपवासाचे पदार्थ किंवा हेल्दी शेकचे सेवन करावे. यामुळे शरीरातील ऊर्जा कमी न होता टिकून राहते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला चैत्र नवरात्रीच्या उपवासात शरीरात ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी हेल्दी ड्रायफ्रूट शेक कसे बनवावे? याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – iStock)
केळी खायला आवडत नाहीत? मग सोप्या पद्धतीमध्ये केळ्यांपासून बनवा तिखट गोड कोशिंबीर, चव लागेल सुंदर