
दीप अमावस्येनिमित्त घरी बनवा गोड बाजरीचे दिवे
आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दिप अमावस्या असते. दिप अमावस्येनंतर श्रावण महिन्याला सुरुवात होते. संपूर्ण राज्यभरात दीप अमावस्या साजरा केली जाते. घरातील दिवे स्वच्छ घासून पुसून दिव्यांची पूजा केली जाते. संपूर्ण राज्यभरात वेगवेगळ्या पद्धतीने दीप अमावस्या साजरी केली जाते.प्रत्येक घरात वेगवेगळ्या पिठांचा वापर करून दिवे तयार केले जातात. त्यामध्ये बाजरीच्या पिठाचे दिवे बनवण्याची परंपरा मागील अनेक वर्षांपूर्वीची आहे. बाजरीच्या पिठाचा वापर करून खमंग गोड दिवे तयार केले जातात. हे दिवे बनवण्यासाठी सुद्धा अतिशय सोपे आहे. योग्य पद्धतीचा वापर करून बनवलेले दिवे लवकर तुटत नाहीत. तसेच दिवे तयार करताना किंवा वाफवताना जास्त काळजी घ्यावी. चला तर जाणून घेऊया बाजरीचे दिवे बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – सोशल मीडिया)
१० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट लाल भोपळ्याचे भरीत, पावसाळ्यात पचनासाठी ठरेल अतिशय हलका पदार्थ