१० मिनिटांमध्ये झटपट बनवा केळीचे खमंग आप्प्पे
रोजच्या आहारात नियमित फळांचे सेवन करणे आवश्यक आहे. सकाळच्या नाश्त्यात किंवा इतर वेळी भूक लागल्यानंतर फळांचे सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे होतात. बऱ्याचदा घरात केळी आणून ठेवली जातात. केळी खाल्यामुळे शरीराची पचनक्रिया सुधारते. तसेच काहींना दुधात केळी टाकून खायला खूप जास्त आवडतात. पण पिकलेली केळी खाल्ली जात नाही. पिकलेल्या केळ्यांची चव खूप जास्त गोड लागते. त्यामुळे लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळेच पिकलेली केळी खाण्यास नकार देतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला पिकलेल्या केळींपासून चाविष्ट आप्पे बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. नेहमीच तिखट आप्पे खाऊन कंटाळा आल्यानंतर तुम्ही खमंग गोड आप्पे बनवू शकता. चला तर जाणून घेऊया केळीची आप्पे बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pintrest)
Shravan 2025 : उपवासाला भूक लागते? मग बाहेरून कशाला आता घरीच बनवा कुरकुरीत बटाट्याचे चिप्स
शिल्लक राहिलेल्या ब्रेडपासून १० मिनिटांमध्ये बनवा मऊ रसरशीत गुलाबजाम, श्रावणात बनवा स्पेशल पदार्थ