लहान मुलांसाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बनाना चॉकलेट आईस्क्रीम
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीरात उष्णता वाढू लागते. शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी आईस्क्रीम, सरबत आणि इतर पेयांचे सेवन केले जाते. कारण उन्हातून बाहेर जाऊन आल्यानंतर काहींना काही थंड खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. अशावेळी कोल्ड्रिंक किंवा इतर कोणतीही पेय पिण्यापेक्षा तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये घरी बनाना चॉकलेट आईस्क्रीम बनवू शकता. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं आईस्क्रीम हा पदार्थ खायला खूप आवडतो. आईस्क्रीमची नाव घेतल्यानंतर अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. नेहमी नेहमी बाजारातून विकत आणलेले आईस्क्रीम खाण्यापेक्षा तुम्ही घरी सोप्या पद्धतीमध्ये बनाना चॉकलेट आईस्क्रीम बनवू शकता. चॉकलेट खाणे आरोग्यच्या दृष्टीने अतिशय पौष्टिक आहे. याशिवाय नियमित केल्याचे सेवन केल्यामुळे शरीराची पचनक्रिया सुधारते. चला तर जाणून घेऊया बनाना चॉकलेट आईस्क्रीम बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)