नासलेले दूध फेकून देण्याऐवजी घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा नासकवणी
सर्वच घरांमध्ये नेहमी दूध आणले जाते. काहींना चहासोबत दूध लागते तर काहींना प्रोटीनशेक किंवा गोड पदार्थ बनवण्यासाठी दुधाचा वापर केला जातो. याशिवाय दुधाचा वापर इतरही अनेक गोष्टींसाठी केला जातो. दुधामध्ये असलेले गुणधर्म आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आणि प्रभावी आहेत. बऱ्याचदा घाईगडबडीच्या वेळी दूध गरम करण्यास विसरल्यानंतर किंवा दुधात लिंबू टाकल्यामुळे दूध लगेच खराब होऊन जाते. दुधाच्या गाठी तयार होऊन दूध पूर्णपणे खराब होऊन जाते. खराब झालेले दूध अनेक घरांमध्ये फेकून दिले जाते. तर काही लोक याचं दुधाचा वापर करून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला नसलेले दूध खराब झाल्यानंतर त्याच दुधाचा वापर करून नासकवणी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ ५ मिनिटांमध्ये झटपट तयार होतो. याशिवाय नासलेल्या दुधापासून अनेक लोक पनीर सुद्धा बनवतात. चला तर जाणून घेऊया नासकवणी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
Recipe: विकेंडला घरीच बनवा रेस्टाॅरंट स्टाइल ‘पनीर दो प्याजा’; चव अशी की घरातील सर्वच होतील खुश