
५ मिनिटांमध्ये सकाळच्या नाश्त्यात बनवा कॅफे-स्टाईल Banana Milk Toast, लहान मुलांसह मोठेसुद्धा खातील आवडीने
सकाळच्या नाश्त्यात लहान मुलांना कायमच टेस्टी पदार्थ खाण्यास हवे असतात. नेहमीच कांदापोहे, उपमा, शिरा किंवा साऊथ इंडियन पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन खाण्याची खूप जास्त इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले बनाना मिल्क टोस्ट बनवू शकता. केळी, ब्रेड आणि दुधाचा वापर करून बनवलेला चविष्ट पदार्थ लहान मुलांसह मोठेसुद्धा अतिशय आवडीने खातील. हा पदार्थ सकाळच्या किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी उत्तम आहे. बऱ्याचदा लहान मुलांना डब्यात चपाती भाजी खाऊन खूप जास्त कंटाळा येतो. मुलांना डब्यात कायमच नवनवीन पदार्थ खाण्यास हवे असतात. त्यामुळे बनाना मिल्क टोस्ट तुम्ही डब्यात देऊ शकता. घरात विकत आणलेली केळी बऱ्याचदा मऊ होऊन जातात. मऊ झालेली केळी खाण्याची कोणालाही इच्छा होत नाही. नैसर्गिक गोडवा असलेली केळी शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर ठरतात. मधुमेहाच्या रुग्णांना गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यानंतर झटपट तुम्ही बनाना मिल्क टोस्ट बनवू शकता. घाईच्या वेळी झटपट सकाळचा नाश्ता बनवायचा असल्यास बनाना मिल्क टोस्ट बनवू शकता. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)