घाईगडबडीमध्ये झटपट बनवा चमचमीत भरलेली भेंडी
नेहमी डब्यात काय भाजी बनवावी? असे अनेक प्रश्न महिलांना रोजच पडतात. नेहमीच त्याच ठराविक भाज्या खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास तुम्ही भरलेली भेंडी बनवू शकता. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं भरलेली भेंडी खायला खूप आवडतात. शेंगदाणे आणि इतर मसाल्यांचा वापर करून बनवलेली भेंडी चवीला अतिशय सुंदर आणि चटकदार लागते. भेंडीची भाजी बनवताना ती अतिशय चिकट होऊन जाते. भेंडीमधील चिकटपणामुळे अनेकांना भेंडी खायला आवडत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला भेंडीमधील चिकटपणा कमी करण्यासाठी काही सोप्या टिप्स सांगणार आहोत. भरलेली भेंडी तुम्ही चपाती, भाकरी किंवा भातासोबत सुद्धा खाऊ शकता. चला तर जाणून घेऊया भरलेली भेंडी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
कडू कारलंही होईल आवडीचं! एकदा घरी नक्की बनवून पहा भरलेलं कारलं; अस्सल मराठी चवीची भन्नाट रेसिपी
दुबई स्पेशल पदार्थ! सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा ‘मलई ब्रेड विथ चाय’, दिवसाची सुरुवात होईल मस्त