दुपारच्या जेवणात काय बनवावं सुचत नाही? मग झटपट बनवा काळ्या चण्यांचा भात
दुपारच्या जेवणात नेहमीच वरण भात, चपाती भाजी खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन आणि टेस्टी पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. अशावेळी बाहेरून चायनीज किंवा इतर वेगवेगळे पदार्थ आणून खाल्ले जातात. मात्र पण सतत तिखट तेलकट पदार्थ खाल्यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. दैनंदिन आहारात कायमच हेल्दी आणि सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. यामुळे शरीराची पचनक्रियासुद्धा निरोगी राहण्यास मदत होते. अनेक घरांमध्ये दुपारच्या जेवणात चपाती भाजी खाल्ली जाते. पण आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये काळ्या वाटाण्यांचा भात बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. काळ्या वाटाण्यांमध्ये प्रथिने, जीवनसत्वे, खनिजे आणि इतर पौष्टिक घटक आढळून येतात. त्यामुळे आहारात काळे वाटणे खावेत. चला तर जाणून घेऊया काळे चण्यांचा भात बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)