सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा पौष्टिक पनीर सँडविच
रविवार म्हंटल की सुट्टीचा दिवस. सुट्टीच्या दिवशी घरात सगळेच सदस्य असतात. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात नेहमीच काय बनवावं? हा प्रश्न बऱ्याचदा सर्वच महिलांना पडतो. नाश्त्यात नेहमीच कांदापोहे, उपमा, शिरा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. नाश्त्यात बाहेरील तिखट किंवा तेलकट पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीरात ऍसिडिटी वाढू लागते. शरीरात वाढलेल्या ऍसिडिटीमुळे उलट्या, मळमळ किंवा इतरही समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट पौष्टिक पनीर सँडविच बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. पनीर खाणे आरोग्यासाठी अतिशय चांगले आहे. यामध्ये असलेले घटक शरीरासाठी फायदेशीर ठरतात. वाढलेले वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी इतर कोणत्याही पदार्थाचे सेवन करण्याऐवजी नाश्त्यात पनीर सँडविचचे सेवन करावे. चला तर जाणून घेऊया पौष्टिक पनीर सँडविच बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
विकतची मिठाई आणण्यापेक्षा ब्रेडचा वापर करून झटपट बनवा मऊमऊ-रवाळ कलाकंद, नोट करून घ्या रेसिपी