Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recipe : मंचुरियन चिली नाही यावेळी बनवा फ्लाॅवर चिली, रेसिपी नोट करा

Manchurian Chili Recipe : चायनीज लव्हर्स असाल तर ही हटके रेसिपी तुम्ही एकदा ट्राय करायलाच हवी. फ्लाॅवरपासून टेस्टी आणि स्पाईसी अशी चिली तयार केली जाऊ शकते जी घरातील सर्वांचेच तोंडाचे चोचले पुरवेल.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 16, 2026 | 09:53 AM
Recipe : मंचुरियन चिली नाही यावेळी बनवा फ्लाॅवर चिली, रेसिपी नोट करा

Recipe : मंचुरियन चिली नाही यावेळी बनवा फ्लाॅवर चिली, रेसिपी नोट करा

Follow Us
Follow Us:
  • चायनिज लव्हर्ससाठी ही रेसिपी खास ठरणार आहे.
  • मंचुरीयन चिली किंवा चिकन चिली तुम्ही अनेकदा खाल्ली असेल.
  • पण तुम्ही कधी फ्लाॅवर चिली खाल्ली आहे का?
फ्लॉवरपासून नेहमी भाजी, पराठा किंवा कुरकुरीत फ्राय असे पदार्थ बनवले जातात. पण याच फ्लॉवरला चायनीज स्टाइलमध्ये मसालेदार आणि चटपटीत ट्विस्ट दिला, तर तयार होते भन्नाट फ्लॉवर चिली. ही फ्लाॅलर चिली चवीला फार अप्रतिम लागते. तुम्ही पार्टी स्नॅक्ससाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी हा पदार्थ बनवून खाऊ शकता. मुख्य म्हणजे याची चव फक्त लहानांनाच नाही तर मोठ्यांनाही पसंत पडणारी आहे, ज्यामुळे एकाच पदार्थाने घरातील सर्वांना खुश केले जाऊ शकते. चायनीज लव्हर्ससाठी ही डिश एक चांगला पर्याय ठरेल. संध्याकाळच्या नाश्त्यासाठी, पार्टीसाठी किंवा जेवणात साइड डिश म्हणून ही रेसिपी एकदा नक्की करून पाहा.

शरीराला आतून मजबूत करण्यास करेल मदत, मोरिंगा पराठा कसा बनवायचा? जाणून घ्या रेसिपी

साहित्य

  • फ्लॉवर – १ मध्यम आकाराचा
  • मैदा – ३ टेबलस्पून
  • कॉर्नफ्लोअर – २ टेबलस्पून
  • आले-लसूण पेस्ट – १ टीस्पून
  • लाल तिखट – १ टीस्पून
  • काळी मिरी पावडर – अर्धा टीस्पून
  • मीठ – चवीनुसार
  • पाणी – आवश्यकतेनुसार
  • तेल – तळण्यासाठी
  • कांदा – १, चौकोनी कापलेला
  • ढोबळी मिरची – १, चौकोनी कापलेली
  • हिरव्या मिरच्या – २
  • सोया सॉस – १ टेबलस्पून
  • चिली सॉस – १ टेबलस्पून
  • टोमॅटो सॉस – १ टेबलस्पून
  • व्हिनेगर – १ टीस्पून
  • स्प्रिंग अनियन – सजावटीसाठी
Nagpanchami Recipe: नागपंचमीनिमित्त पारंपरिक पद्धतीने बनवा तांदळाची खांडवी, नोट करून घ्या झटपट होणारा पदार्थ

कृती

  • फ्लॉवरचे छोटे तुकडे करून स्वच्छ धुवा. गरम पाण्यात थोडे मीठ घालून फ्लॉवर काही मिनिटे ठेवून घ्या. त्यानंतर पाणी पूर्णपणे काढून टाका.
  • एका भांड्यात मैदा, कॉर्नफ्लोअर, लाल तिखट, काळी मिरी, आले-लसूण पेस्ट आणि मीठ घ्या. त्यात थोडे थोडे पाणी घालून मध्यम घट्टसर बॅटर तयार करा.
  • फ्लॉवरचे तुकडे बॅटरमध्ये व्यवस्थित घोळवून घ्या. कढईत तेल गरम करून फ्लॉवरचे तुकडे सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. तळलेले तुकडे बाजूला काढा.
  • दुसऱ्या कढईत थोडे तेल गरम करून त्यात हिरव्या मिरच्या, कांदा आणि ढोबळी मिरची घाला. भाज्या जास्त मऊ न करता हलक्या आचेवर परता.
  • आता त्यात सोया सॉस, चिली सॉस, टोमॅटो सॉस आणि व्हिनेगर घाला. सर्व साहित्य चांगले एकत्र करून काही सेकंद परता.
  • तळलेला कुरकुरीत फ्लॉवर कढईत घालून सॉसमध्ये व्यवस्थित मिक्स करा. फ्लॉवरवर सॉसचे आवरण चांगले लागेपर्यंत मोठ्या आचेवर एक-दोन मिनिटे परता.
  • गॅस बंद करून वरून बारीक चिरलेला स्प्रिंग अनियन घाला. गरमागरम फ्लॉवर चिली लगेच सर्व्ह करा.

Web Title: How to make califlower chili at home note the recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2026 | 09:53 AM

Topics:  

  • gobi manchurian
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

Recipe : जेवणात तोंडी लावायला घरी बनवा झणझणीत आणि चटकदार चवीची लसणाची चटणी, रेसिपी नोट करा
1

Recipe : जेवणात तोंडी लावायला घरी बनवा झणझणीत आणि चटकदार चवीची लसणाची चटणी, रेसिपी नोट करा

Recipe : सकाळच्या नाश्त्यात काय बनवावं ते सुचत नाहीये? मग अशाप्रकारे बनवा टेस्टी मिलेट नगेट्स
2

Recipe : सकाळच्या नाश्त्यात काय बनवावं ते सुचत नाहीये? मग अशाप्रकारे बनवा टेस्टी मिलेट नगेट्स

Recipe : विकेंडसाठी खास, अशाप्रकारे बनवा कुरकुरीत आणि टेस्टी ‘चिकन पकोडा’ ‘
3

Recipe : विकेंडसाठी खास, अशाप्रकारे बनवा कुरकुरीत आणि टेस्टी ‘चिकन पकोडा’ ‘

Recipe : रात्रीच्या जेवणाचा बेत बनवा खास, नोट करा सोयाबीन-मशरुम बिर्याणी; चव अशी की कुटुंबातील सर्वच होतील खुश
4

Recipe : रात्रीच्या जेवणाचा बेत बनवा खास, नोट करा सोयाबीन-मशरुम बिर्याणी; चव अशी की कुटुंबातील सर्वच होतील खुश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.