Moringa Paratha Recipe : सकाळच्या नाश्त्याला हेल्दी आणि टेस्टी पदार्थ शोधत आहात? मग मोरिंगा पराठा तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरेल. हा पराठा शरीरात पोषक घटकांचा साठा वाढवण्यास आणि आतून बळकटी मिळवून देण्यास मदत करतो.
(फोटो सौजन्य: Pinterest)
Follow Us:
Follow Us:
विस्तार
मोरिंगाच्या पानांमध्ये लोह, कॅल्शियम आणि फायबरसारखे पोषक घटक आढळतात.
मोरिंगाची पाने, गव्हाचे पीठ आणि घरातील मसाल्यांपासून झटपट पराठे तयार करता येतात.
गरमागरम मोरिंगा पराठा दही, हिरवी चटणी किंवा लोणच्यासोबत अधिक स्वादिष्ट लागतो.
मोरिंगा ज्याला मराठीत शेवगा असं म्हटलं जातं याचे सेवन आपल्या आरोग्यासाठी खूप फायद्याचे ठरते. शरीराला निरोगी आणि आतून मजबूत बनवायचे असेल तर मोरींगाचे सेवन तुमच्या आरोग्यासाठी खूप फायद्याचे ठरु शकते. यात लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन सी आणि इतर अनेक आवश्यक पोषक तत्वे असतात. अनेक सेलिब्रिटी तसेच पंतप्रधान मोदी देखील आपल्या आहारात मोरींगाचे सेवन करतात. त्यांनी मागेच नागरिकांना याचा आपल्या आहारात समावेश करण्याचा सल्ला दिला होता. मोरींगापासून आपण अनेक प्रकारचे पदार्थ बनवू शकतो पण आज या लेखात आपण यापासून टेस्टी आणि खमंग भाजलेला पराठा कसा तयार करायचा याची रेसिपीजाणून घेणार आहोत.
सर्वप्रथम मोरिंगाची पाने देठापासून वेगळी करून घ्या. पाने स्वच्छ पाण्याने धुऊन बारीक चिरून घ्या. पानांची चव कडवट वाटत असल्यास ती कोमट पाण्यात सुमारे ५ मिनिटे ठेवू शकता. यामुळे कडवटपणा काही प्रमाणात कमी होतो.
एका मोठ्या भांड्यात गव्हाचे पीठ घ्या. त्यात चिरलेली मोरिंगाची पाने, कांदा, हिरवी मिरची, आले, ओवा, हळद, लाल तिखट, जिरेपूड, दही आणि चवीनुसार मीठ घाला. सर्व साहित्य एकत्र करून घ्या.
आता थोडं-थोडं पाणी घालत मऊसर पीठ मळून घ्या. पीठ ओल्या कपड्याने झाकून १५ ते २० मिनिटे बाजूला ठेवा. यामुळे पीठ छान मुरेल.
तयार पीठाच्या छोट्या-छोट्या गोळ्या करून घ्या. एका गोळ्यावर थोडं कोरडं पीठ लावून गोल पराठा लाटून घ्या.
तवा मंद आचेवर गरम करून त्यावर पराठा ठेवा. दोन्ही बाजूंनी थोडा भाजल्यानंतर त्यावर तेल किंवा तूप लावा. पराठा दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या. गॅसची आच खूप मोठी ठेवू नका, अन्यथा पराठा बाहेरून करपून आणि आतून कच्चा राहू शकतो.
गरमागरम मोरिंगा पराठा दही, हिरवी चटणी किंवा लोणच्यासोबत सर्व्ह करा. नाश्त्यासाठी तसेच मुलांच्या टिफिनसाठीही हा पराठा चांगला पर्याय ठरू शकतो.
ताजी मोरिंगाची पाने उपलब्ध नसल्यास मोरिंगा पावडरचा वापर करू शकता.
पराठ्यात थोडं किसलेलं पनीर मिसळल्यास तो आणखी स्वादिष्ट होतो.
तुपावर पराठा भाजल्यास त्याला छान चव आणि कुरकुरीतपणा येतो.
Web Title: Moringa paratha recipe in marathi healthy breakfast recipe with drumstick leaves