Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोबीची भाजी खायला आवडत नाही? मग लहान मुलांच्या डब्यासाठी झटपट बनवा चविष्ट चणाडाळ कोबी

आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये चणाडाळ कोबी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. ही भाजी लहान मुलांच्या डब्यासाठी किंवा जेवणासाठी सुद्धा उत्तम पर्याय आहे. जाणून घ्या चणाडाळ कोबी बनवण्याची रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 06, 2025 | 03:12 PM
लहान मुलांच्या डब्यासाठी झटपट बनवा चविष्ट चणाडाळ कोबी

लहान मुलांच्या डब्यासाठी झटपट बनवा चविष्ट चणाडाळ कोबी

Follow Us
Follow Us:

कोबीच्या भाजीचे नाव ऐकल्यानंतर सर्वच मुलं नाक मुरडतात. कोबीच्या भाजीचा वास अनेकांना आवडत नाही.पण कोबीची भाजी आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. या भाजीमध्ये असलेले गुणधर्म शरीरासाठी अतिशय गुणकारी ठरतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये चणाडाळ कोबी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. लहान मुलं भाज्या खाण्यास कायमच नकार देतात. पण कोबीच्या भाजीपासून बनवलेले मंचुरियन किंवा चायनीज भेळ आवडीने खातात. लहान मुलांच्या आरोग्यासाठी सगळ्याच्या भाजी गुणकारी ठरतात. सकाळी उठल्यानंतर घाईगडबडीच्या वेळी डब्यासाठी कोणती भाजी बनवावी, बऱ्याचदा सुचत नाही. अशावेळी कोबीची भाजी तुम्ही कमीत कमी साहित्यामध्ये बनवू शकता. चला तर जाणून घेऊया चणाडाळ कोबी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य: Pinterest)

वाढलेले वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी रोजच्या जेवणात करा अळशीच्या चटणीचे सेवन, नोट करून घ्या रेसिपी

साहित्य:

  • कोबी
  • भिजवलेली चणा डाळ
  • हिरवी मिरची
  • मोहरी
  • मीठ
  • ओल्या खोबऱ्याचा किस
  • कढीपत्त्याची पाने
  • हळद
  • टोमॅटो
  • कांदा
  • कोथिंबीर
नाश्त्यात काहीतरी नवीन खायचं असेल तर सोप्या पद्धतीमध्ये झटपट बनवा कुरकुरीत बटाट्याचा चिल्ला, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • चणाडाळ कोबी बनवण्यासाठी सर्वप्रथम, कोबीची भाजी स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर भाजी बारीक कापा. वाटीमध्ये चण्याची डाळ भिजण्यासाठी ठेवा.
  • कढईमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, जिरं, बारीक चिरलेला लसूण, कढीपत्त्याची पाने टाकून व्यवस्थित भाजा. त्यानंतर त्यात कांदा आणि टोमॅटो टाकून चवीनुसार मीठ टाका.
  • कांदा टोमॅटो शिजल्यानंतर त्यात हळद टाकून मिक्स करा. त्यानंतर त्यात भिजवलेली चणा डाळ टाकून वाफेवर शिजवा. यामुळे भाजीची चव आणखीनच सुंदर लागेल.
  • चणा डाळ अर्धवट शिजल्यानंतर त्यात बारीक चिरलेला कोबी टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि वाफेवर शिजवा.
  • भाजी शिजल्यानंतर सगळ्यात शेवटी त्यात ओल्या खोबऱ्याचा किस टाकून मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली चणाडाळ कोबी. ही भाजी चपाती किंवा भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता.

Web Title: How to make chanadal cabbage bhaji at home simple food recipe cooking tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2025 | 03:11 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी
1

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी
2

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
3

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी
4

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.