साधी खिचडी खाऊन कंटाळा आला आहे? ही मसालेदार हरियाली मटर खिचडी नक्की बनवून पहा, नोट करून घ्या रेसिपी
हिवाळा ऋतू संपून लवकर उन्हाळ्याला सुरुवात होणार आहे. वातावरणात सतत काहींना काही बदल होत असतात. या बदलांमुळे आरोग्य बिघडते. कधी थंडी तर कधी कडक ऊन पडत असल्यामुळे आरोग्य बिघडून जाते. अशा वातावरणात शरीराची खूप जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. आजारी पडल्यानंतर किंवा जेवण बनवण्याचा कंटाळा आल्यानंतर कायमच आवडीने बनवला जाणारा पदार्थ म्हणजे दालखिचडी. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं दालखिचडी खायला खूप जास्त आवडते. भरपूर भाज्या आणि अतिशय कमी मसाल्यांचा वापर करून बनवलेला पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. आजारपणात कायमच खिचडी बनवून खाण्यास दिली जाते. पण नेहमीच तीच साधी खिचडी खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये हरियाली मटार खिचडी बनवू शकता.हा पदार्थ कुकरमध्ये सहज तयार होतो. याशिवाय थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात मोठ्या प्रमाणावर मटार उपलब्ध असतात. चला तर जाणून घेऊया हरियाली मटार खिचडी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
Recipe : जेवणाचा मेन्यू करा खास, घरी बनवा चविष्ट आणि खमंग चवीची ‘मेथी मसाला बाटी’






