
घाईगडबडीच्या वेळी नाश्त्यासाठी बनवा गारेगार चिकू मिल्कशेक
थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात अनेक वेगवेगळी फळे उपलब्ध असतात. त्यातील अतिशय मऊ आणि लहान मुलांना सहज खाता येणारे फळ म्हणजे चिकू. गोड चवीचा चिकू सगळ्यांचं खायला खूप जास्त आवडतो. चिकूमध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे थकवा, अशक्तपणा कमी होण्यास मदत होते. बऱ्याचदा मधुमेह असलेले रुग्ण फळे खाण्यास नकार देतात. पण चिकूचे सेवन केल्यास शरीराला कोणतीही हानी पोहचणार नाही. यामध्ये असलेल्या फायबरमुळे शरीराची पचनक्रिया निरोगी राहते आणि पचनाच्या कोणत्याही समस्या उद्भवुत नाहीत. चिकूमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम इत्यादी अनेक घटक आढळून येतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळ्च्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये चिकू मिल्कशेक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ ५ मिनिटांमध्ये लगेच तयार होतो. याशिवाय पौष्टिकतेने समृद्ध असलेल्या मिल्कशेकचे सेवन केल्यास शरीरात ऊर्जा टिकून राहील.(फोटो सौजन्य – pinterest)
Recipe : तुपात बुडालेली लिट्टी आणि मसालेदार चोखा; युपीची ही पारंपरिक डिश कधी खाल्ली की नाही?