वाढलेले वजन कमी करताना सकाळच्या नाश्ता करा हेल्दी टेस्टी कोथिंबीरीचे सूप
वाढलेले वजन कमी करण्यासाठी महिलांसह पुरुष सुद्धा सतत काहींना काही करत असतात. कधी बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या प्रोटीनशेकचे सेवन केले जाते. मात्र या प्रोटीनशेकचे नियमित सेवन केल्यामुळे किडनीच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे वजन कमी करताना कोणत्याही हानिकारक पदार्थांचे सेवन करण्याऐवजी कमी कॅलरीजयुक्त पदार्थांचे आहारात नियमित सेवन करावे. यामुळे शरीरावर वाढलेला चरबीचा घेर कमी होतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये कोथिंबीरीचे सूप बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या सूपचे सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे होतील आणि तुम्ही कायम निरोगी राहाल. लहान मुलांसह मोठ्यानं कोथिंबीर खायला आवडत नाही. अशावेळी कोथिंबीरीचे सूप बनवणे अतिशय योग्य पर्याय आहे.(फोटो सौजन्य – iStock)
सकाळच्या नाश्त्यात सोप्या पद्धतीमध्ये बनवा दह्यातले पाेहे! पोटाला मिळेल थंडावा, नोट करून घ्या रेसिपी