
थंड वातावरणात संध्याकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा क्रिस्पी कॉर्न भजी
पावसाळ्याच्या थंडगार वातावरणात सगळ्यांचं गरमागरम भजी खाण्याची इच्छा होते. भजीचे नाव ऐकल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. गरमागरम चहासोबत सगळ्यांचं भजी खायला खूप आवडते. कांदाभजी, बटाटाभजी, पालकभजी इत्यादी भजी नेहमीच खाल्या जातात. मात्र आज आम्ही तुम्हाला झटपट कॉर्न भजी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. मक्याचे दाणे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहेत. या दाण्यांचे सेवन केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. संध्याकाळच्या वेळी छोटी मोठी भूक लागल्यानंतर काहींना काही खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. नेहमीच संध्याकाळी तिखट तेलकट खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. भजी हा पारंपरिक पदार्थ आहे. बेसनाच्या पिठात वेगवेगळ्या भाज्या घोळवून भजी तयार केली जाते. चला तर जाणून घेऊया कॉर्न भजी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास सोप्या पद्धतीमध्ये बनवा हापूस आंब्यांची चविष्ट खीर, नोट करा रेसिपी