सकाळच्या नाश्त्यात लहान मुलांसाठी झटपट बनवा चविष्ट क्रीम सँडविच
लहान मुलांसाठी सकाळच्या नाश्त्यात नेहमी नेहमी काय बनवावे? हे बऱ्याचदा सुचत नाही. नाश्त्यात कांदापोहे, उपमा, शिरा किंवा इतर इडली, डोसा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याचा लहान मुलं हट्ट करतात. लहान मुलांना नेहमीच बाहेर विकत मिळणारे चमचमीत पदार्थ खाण्यास हवे असतात. पण सतत तेलकट किंवा तिखट पदार्थ खाल्यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला लहान मुलांच्या नाश्त्यासाठी झटपट चविष्ट क्रीम सँडविच बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. सँडविच हा पदार्थ लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडतो. वेगवेगळ्या भाज्या, सॉस आणि चीज इत्यादी पदार्थांचा वापर करून बनवलेला पदार्थ आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. लहान मुलं भाज्या खाण्यास बऱ्याचदा नकार देतात. अशावेळी मुलांना सँडविच बनवून द्यावे. चला तर जाणून घेऊया चविष्ट क्रिमी सँडविच बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
भाजी काय बनवावी सुचत नाही? ५ मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत कांद्याची चटणी, नोट करा रेसिपी
संध्याकाळचा नाश्ता थोडा चिजी होऊन जाऊद्यात; घरी बनवा सर्वांच्या आवडीचा Mac And Cheese