Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recipe : उरलेल्या शिळ्या भाताला फेकू नका, त्यापासून बनवा कुरकरीत भजी, रेसिपी नोट करा

Crispy Bhaji From Leftover Rice : तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही उरलेल्या शिळ्या भातापासूनही चविष्ट असे कुरकरीत भजी तयार करु शकता. यामुळे चवदार पदार्थ बनेल आणि शिळा भात वाया देखील जाणार नाही.

  • By नुपूर भगत
Updated On: May 08, 2026 | 09:40 AM
Recipe : उरलेल्या शिळ्या भाताला फेकू नका, त्यापासून बनवा कुरकरीत भजी, रेसिपी नोट करा

Recipe : उरलेल्या शिळ्या भाताला फेकू नका, त्यापासून बनवा कुरकरीत भजी, रेसिपी नोट करा

Follow Us
Follow Us:
  • अनेकदा आपल्या घरात रात्रीचा शिळा भात उरतो.
  • हा भात नव्या प्रकारे खायचा असेल तर तुम्ही याचे भजी तयार करु शकता.
  • भातापासून बनवलेले हे भजी चवीला फार छान लागतात.
घरात अनेकदा भात उरतो आणि तो पुन्हा खाण्याची इच्छा होत नाही. अशावेळी तो फेकून देण्यापेक्षा त्यापासून एखादी झटपट आणि चविष्ट डिश तयार केली, तर अन्नाची नासाडीही टळते आणि नवीन चवही अनुभवायला मिळते. उरलेल्या भाताचे पकोडे ही अशीच एक सोपी आणि स्वादिष्ट रेसिपी आहे. बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ असलेले हे पकोडे चहासोबत खायला अप्रतिम लागतात. विशेष म्हणजे ही रेसिपी तयार करण्यासाठी फारसा वेळ लागत नाही आणि घरात सहज उपलब्ध असलेल्या साहित्यामधूनच ती बनवता येते. मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ही रेसिपी नक्की आवडेल.

Summer Special : उन्हाळ्यात घरी बनवा ट्रेंडी, थंडगार ‘आईस माचा ड्रिंक’; कॅफे सारखी चव मिळेल घरीच

साहित्य

  • 1 कप शिजलेला उरलेला भात
  • 1 कांदा बारीक आणि लांब चिरलेला
  • 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
  • 1/4 कप कोथिंबीर बारीक चिरलेली
  • 1 टेबलस्पून कसुरी मेथी
  • 1/4 टीस्पून हळद
  • 1 टीस्पून लाल तिखट
  • चवीनुसार मीठ
  • 1/2 कप बेसन
  • तळण्यासाठी तेल
Recipe : अस्सल महाराष्ट्रीयन चवीची झणझणीत ‘मिसळ’ बनवा घरीच, चव अशी की बोटं चाटत राहाल!

कृती

  • सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यात उरलेला शिजलेला भात घ्या. त्यात चिरलेला कांदा, हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर घाला.
  • यानंतर कसुरी मेथी, हळद, लाल तिखट आणि मीठ घालून मिश्रण एकत्र करा.
  • आता त्यात बेसन घाला. मिश्रण एकजीव करण्यासाठी आवश्यकतेनुसार 2 ते 4 चमचे पाणी घालून सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करा.
  • कढईत तेल गरम करा. तेल मध्यम गरम झाल्यावर तयार मिश्रणाचे छोटे छोटे पकोडे तेलात सोडा.
  • मध्यम आचेवर पकोडे सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. तळलेले पकोडे टिश्यू पेपरवर काढा, त्यामुळे अतिरिक्त तेल निघून जाईल.
  • अवघ्या 15 ते 20 मिनिटांत गरमागरम भाताचे पकोडे तयार होतील.
  • हे कुरकुरीत पकोडे हिरव्या चटणीसोबत, टोमॅटो सॉसबरोबर किंवा गरम चहासोबत सर्व्ह करा.
  • संध्याकाळच्या हलक्या भुकेसाठी ही एक उत्तम डिश ठरू शकते.
 

Web Title: How to make crispy bhaji from leftover rice note the recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2026 | 09:40 AM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव
1

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी
2

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी
3

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
4

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.