Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाजी काय बनवावी सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये बनवा कांद्याची कुरकुरीत सुकी चटणी, साध्या जेवणाला लागेल रंगतदार चव

जेवणात भाजी बनवण्याचा कंटाळा आल्यास सोप्या पद्धतीमध्ये झटपट बनवा कांद्याची सुकी चटणी. हा पदार्थ घरातील प्रत्येकाला खूप जास्त आवडेल. जाणून घ्या कांद्याची चटणी बनवण्याची रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 14, 2026 | 11:08 AM
भाजी काय बनवावी सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये बनवा कांद्याची कुरकुरीत सुकी चटणी, साध्या जेवणाला लागेल रंगतदार चव

भाजी काय बनवावी सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये बनवा कांद्याची कुरकुरीत सुकी चटणी, साध्या जेवणाला लागेल रंगतदार चव

Follow Us
Follow Us:

भारतीय जेवणाचा ताटात कितीही आवडीचे पदार्थ असले तरीसुद्धा चटणी कायमच लागते. जेवणाची चव वाढवण्यासाठी ताटात लोणचं, पापड, चटणी इत्यादी पदार्थ वाढले जातात. साध्या जेवणाला चविष्ट करण्यासाठी चटणी खाल्ली जाते. खोबऱ्याची चटणी, लसूण चटणी, तिळाची चटणी इत्यादी वेगवेगळ्या पदार्थांपासून चटण्या बनवल्या जातात. पण नेहमीच त्याच ठराविक चटण्या खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये कांद्याची सुकी चटणी बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. कांद्याची चटणी चवीला अतिशय सुंदर लागते. ऑफिसच्या डब्यासाठी बऱ्याचदा काय भाजी बनवावी सुचत नाही. अशावेळी तुम्ही कांद्याची कुरकुरीत चटणी बनवू शकता. तयार केलेली कांद्याची चटणी ४ ते ५ दिवस व्यवस्थित टिकून राहते आणि चव सुद्धा चांगली लागते. गरमागरम भाकरी किंवा चपातीसोबत कांद्याची चटणी असेल तर चार घास जास्त जातात. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

पोटावर वाढलेला चरबीचा घेर महिनाभरात होईल कमी! सकाळच्या नाश्त्यात करा ओटमील पॅनकेक्सचा समावेश

साहित्य:

  • कांदा
  • जिरं
  • मेथी दाणे
  • लाल तिखट
  • हळद
  • मीठ
  • पांढरी उडीद डाळ
  • चणा डाळ
  • हिंग
  • चिंच
  • शेंगदाणे
  • कडीपत्ता
  • लसूण
  • लाल मिरच्या
Summer Special : कडक उष्ण वातावरणात शरीराला मिळवून द्या थंडावा, घरी बनवा मलाईदार ‘लस्सी’

कृती:

  • कुरकुरीत कांद्याची चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम, पॅन गरम करण्यासाठी ठेवा. गरम पॅनमध्ये धणे, जिरे, मेथी दाणे, चणा डाळ, पांढरी उडीद डाळ, चिमूटभर हिंग, चिंच घालून मंद आचेवर भाजा.
  • कढईमध्ये तेल गरम करून त्यात उभा चिरून घेतलेला कांदा टाकून लालसर कुरकुरीत होईपर्यंत भाजा. त्यानंतर तेलात शेंगदाणे, कडीपत्ता, लसूण पाकळ्या, सुक्या लाल मिरच्या वेगवेगळ्या भाजा.
  • भाजून घेतलेले सर्व साहित्य थंड करण्यासाठी ठेवा. थंड झालेले सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक वाटून घ्या.
  • त्यानंतर वाटून घेतलेल्या चटणीमध्ये चवीनुसार मीठ, लाल तिखट आणि थोडीशी हळद घालून पुन्हा एकदा वाटून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली कांद्याची कुरकुरीत सुकी चटणी.

Web Title: How to make crispy dry onion chutney at home benefits of eating onion

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2026 | 11:08 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Oats-Palak Idli: नाश्त्यात काहीतरी वेगळं हवंय? बनवा ओट्स-पालक इडली; चवीला भन्नाट अन् आरोग्यदायीही, वाचा सोपी रेसिपी
1

Oats-Palak Idli: नाश्त्यात काहीतरी वेगळं हवंय? बनवा ओट्स-पालक इडली; चवीला भन्नाट अन् आरोग्यदायीही, वाचा सोपी रेसिपी

Ganeshotsav 2026: कमी साहित्यात गणपती बाप्पासाठी बनवा बेसन मावा मोदक, पारंपरिक मोदकाला द्या शाही ट्विस्ट
2

Ganeshotsav 2026: कमी साहित्यात गणपती बाप्पासाठी बनवा बेसन मावा मोदक, पारंपरिक मोदकाला द्या शाही ट्विस्ट

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी
3

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी

Ganeshotsav 2026: साखरेचा अजिबात वापर न करता गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी बनवा Homemade Khajur Peda, नोट करा रेसिपी
4

Ganeshotsav 2026: साखरेचा अजिबात वापर न करता गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी बनवा Homemade Khajur Peda, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.