हाडांचे दुखणे कमी करण्यासाठी आहारात करा 'या' पौष्टिक चटणीचे सेवन
वय वाढल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. हाडांमध्ये वाढलेल्या वेदना, शरीरात निर्माण झालेला थकवा, अशक्तपणा इत्यादी लक्षणे शरीरात दिसून येतात. हाडांमध्ये वाढलेल्या वेदना कमी करण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार केले जातात. मात्र वारंवार डॉक्टरांच्या गोळ्या औषधांचे सेवन करण्याऐवजी आहारात पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. वाढत्या वयात महिलांना आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवतात. मात्र या समस्यांकडे दुर्लक्ष करतात. पण सतत दुर्लक्ष केल्यामुळे शरीरातील छोटे आजार मोठे स्वरूप घेण्याची शक्यता असते. त्यामुळे महिलांनी स्वतःच्या आरोग्याची जास्त काळजी घ्यावी. आज आम्ही तुम्हाला हाडांच्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी आहारात कढीपत्त्याची चटणी कशी तयार करावी याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या चटणीचे सेवनामुळे महिलांच्या आरोग्याला अनेक फायदे होतील. (फोटो सौजन्य – iStock)
जेवण बनवण्याचा कंटाळा आलाय? तर मग झटपट घरी बनवा लज्जतदार Egg Rice