१० मिनिटांमध्ये झटपट बनवा दही कबाब, नोट करा रेसिपी
सकाळच्या नाश्त्यात सगळ्यांचं काहींना काही चमचमीत पदार्थ खाण्यास हवे असतात. कायमच तिखट आणि तेलकट पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर पचनास हलके असलेले पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये दही कबाब बनवू शकता. दही खाणे आरोग्यासाठी अतिशय चांगले आहे. यामध्ये असलेले घटक शरीरात निरोगी पेशींची वाढ करतात. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये किंवा इतर वेळी शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी दही खाण्याचा सल्ला दिला जातो. याशिवाय अनेक लोक सकाळच्या वेळी उपाशी पोटी कामानिमित्त बाहेर जातात. पण हवेतील विषारी आणि अतिशय गंभीर विषाणू शरीरात प्रवेश करतात, ज्यामुळे आरोग्य बिघडून जाते. त्यामुळे उपाशी पोटी कुठेही जाणे टाळावे. सकाळी उठल्यानंतर पोटभर नाश्ता केल्यास दिवसाची सुरुवात आनंदी आणि उत्साही होईल. चला तर जाणून घेऊया दही कबाब बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
वाटीभर पनीरपासून १० मिनिटांमध्ये झटपट बनवा रसमलाई मोदक! नोट करून घ्या मोदक बनवण्याची सोपी रेसिपी