१० मिनिटांमध्ये घरी सोप्या पद्धतीत बनवा कुरकुरीत लसूण चटणी
जगभरातील लाखो पर्यटक पारंपरिक आणि चविष्ट पदार्थांची चव चाखण्यासाठी भारतात येतात. भारतामध्ये अतिशय साध्या सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले जेवण सगळ्यांचं खूप जास्त आवडते. जेवणात वापरले जाणारे पारंपरिक मसाले, नैसर्गिक पद्धतीने पिकवलेल्या भाज्या पदार्थाची चव वाढवतात. त्यातील सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे लसूण चटणी. प्रत्येक स्वयंपाक घरात लसूण असतेच. लसूणचा वापर पदार्थाला फोडणी देण्यासाठी केला जातो. याशिवाय घरात भाजी किंवा वरण नसेल तर लसूण चटणीसोबत चपाती, भाकरी, भात खाल्ला जातो. लसूण चटणी वडापाव, भजीपाव, सँडविच इत्यादी सर्वच पदार्थांसोबत खाल्ली जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये कुरकुरीत लसूण चटणी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. लसूण चटणी अतिशय कमी साहित्यामध्ये सहज बनवता येते. बाजारात अनेक वेगवेगळ्या मसाल्यांचा आणि पदार्थांचा वापर करून बनवलेल्या चटण्या उपलब्ध असतात. पण या चटण्या फारकाळ व्यवस्थित टिकून राहत नाही. जाणून घ्या लसूण चटणी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
तोंडाला सुटेल पाणी! गरमागरम चपातीसोबत खाण्यासाठी झटपट बनवा चमचमीत बटाटा वाटाणा भाजी, नोट करा रेसिपी