शरीरात साचलेली सर्दी होईल गायब! १० मिनिटांमध्ये घरी बनवा झणझणीत लसूण चटणी
झणझणीत तिखट पदार्थ खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडतात. तिखट पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यानंतर कोल्हापुरी ठेचा किंवा हिरव्या मिरचीची चटणी बनवून खाल्ली जाते. हे पदार्थ चवीला अतिशय झणझणीत असतात. तांदळाची भाकरी, चपाती, भात इत्यादी पदार्थांसोबत चटणी खाल्ली जाते. वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे आरोग्य बिघडते. सर्दी, खोकला किंवा घशात वाढलेली खवखव कमी करण्यासाठी सूप प्यायले जाते. आलं आणि लसूणचा वापर करून बनवलेली सूप चवीला अतिशय सुंदर लागते. आज आम्ही तुम्हाला गुजरातच्या काठियावाड भागात बनवली जाणारी लसूण चटणी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. लाल रंगाची चटणी गुजरातमध्ये फेमस आहे. लसूण चटणी भाकरी, पराठा किंवा साध्या जेवणासोबतसुद्धा अतिशय चविष्ट लागते. ही चटणी बनवताना दह्याचा वापर केला जातो. बंद हवेच्या डब्यात लसूण चटणी ४ ते ५ दिवस व्यवस्थित टिकून राहते. चला तर जाणून घेऊया लसूण चटणी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
Sitafal Kheer Recipe: दिवाळीत बनवा लक्ष्मीच्या आवडीची सीताफळ खीर, जाणून घ्या रेसिपी