सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा झणझणीत लसूण लोणचं
रोजच्या जेवणाची चव आणखीनच रंगतदार करण्यासाठी आंबट तिखट चवीचे लोणचं कायमच खाल्ले जाते. कैरी, लिंबू, हिरवी, करवंद इत्यादी अनेक वेगवेगळ्या पदार्थांपासून लोणचं बनवलं जात. जेवणाच्या ताटात जर लोणचं असेल तर चार घास जास्त जातात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये लसूण लोणचं बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. लसूण खाणे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. लसूण खाल्ल्यामुळे रक्त पातळ होण्यासोबतच शरीरात जमा झालेले घाणेरडे कोलेस्ट्रॉल नष्ट होण्यास मदत होते. घरातील लहान मुलांना लसूण खायला आवडत नाही. अशावेळी तुम्ही मुलांना लसूण लोणचं बनवून खाण्यास देऊ शकता. जेवणाची चव वाढवण्यासाठी लसूण लोणचं तुम्ही खाऊ शकता. चला तर जाणून घेऊया सोप्या पद्धतीमध्ये लसूण लोणचं बनवण्याची कृती.(फोटो सौजन्य – istock)