लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मुलांना खाऊ घाला गरमागरम साजूक तुपातील खिचडी
राज्यासह संपूर्ण देशभरात साथीच्या आजारांनी धुमाकूळ घातला आहे. साथीचे आजार वाढू लागल्यामुळे सर्दी, खोकला, ताप आणि डेंग्यूच्या रुग्ण संख्येत मोठी वाढ झाली आहे. सर्दी खोकला वाढू लागल्यानंतर शरीराची रोगप्रतिकारशक्ती अतिशय कमकुवत होऊन जाते. याचा लहान मुलांवर मोठ्या प्रमाणात परिणाम दिसून येतो. लहान मुलं आजारी पडल्यानंतर कोणताही पदार्थ खाण्यास किंवा पिण्यास नकार देतात. यामुळे मुलांमध्ये अशक्तपणा वाढून थकवा आणि रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला लहान मुलांना गरमागरम साजूक तुपातील खिचडी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. मऊ खिचडी लहान मुलांसह मोठ्यांनाही खूप जास्त आवडेल. तुपात तयार केलेली खिचडी अतिशय मऊ आणि पौष्टिक असते. खिचडीचे सेवन केल्यामुळे शरीरात वाढलेला अशक्तपणा कमी होण्यास मदत होईल. चला तर जाणून घेऊया साजूक तुपातील खिचडी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य –pinterest)
दिवसाची सुरुवात करा हेल्दी नाश्त्यासाठी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा हेल्दी पनीर सॅलड, नोट करा रेसिपी