श्रावण सोमवारी सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा साबुदाण्याचे कुरकुरीत खमंग पॉपकॉर्न!
हिंदू धर्मात श्रावण महिना अतिशय पवित्र मानला जातो. या महिन्यात शंकराची मनोभावे पूजा करून व्रत, होम किंवा सत्यनारायण पूजा केली जाते.श्रावण महिन्यात येणाऱ्या प्रत्येक सोमवारी महिला उपवास करतात. उपवासाच्या दिवशी सकाळच्या नाश्त्यात काय बनवावं? हे बऱ्याचदा सुचत नाही. अशावेळी सोप्या पद्धतीमध्ये झटपट साबुदाणा खिचडी किंवा साबुदाणा वडा बनवून खाल्ला जातो. पण उपाशी पोटी साबुदाणे खाल्यामुळे पोटात पित्ताचे प्रमाण वाढू लागते आणि शरीराला हानी पोहचते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला उपवासाच्या दिवशी साबुदाण्याचे खमंग कुरकुरीत पॉपकॉर्न बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी वेळात झटपट तयार होतो. उपवासाच्या दिवशी महिला खूप जास्त प्रमाणात चहा पितात. सतत चहाचे सेवन केल्यामुळे अपचनाची समस्या वाढू लागते आणि शरीराला हानी पोहचते. त्यामुळे उपवासाच्या दिवशी कायमच हेल्दी पदार्थ खावेत.(फोटो सौजन्य – istock)
दुबईच्या खास मिठाईचे करा भारतीय स्वयंपाकघरात स्वागत; जाणून घ्या कुनाफ्याची सोपी रेसिपी
साबुदाणा पॉपकॉर्न बनवण्यासाठी सर्वप्रथम, साबुदाणे ३ वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर पाण्यात ५ तास भिजत ठेवा.
कढईमध्ये तूप गरम करून त्यात शेंगदाणे, हिरव्या मिरच्यांचे तुकडे तळून घ्या. त्यानंतर त्यात काजु, मनुका टाकून फ्राय करा.
त्यानंतर कढईमधील गरम तुपात साबुदाणे टाकून भाजा. साबुदाणा फुलण्यास सुरुवात झाल्यानंतर त्यांचा आकार मोठा होईल.
तळून घेतलेले साबुदाणे मोठ्या भांड्यात काढून त्यात भाजलेल्या मिरच्या, शेंगदाणे, मीठ, साखर घालून व्यवस्थित मिक्स करा.
तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले साबुदाणा पॉपकॉर्न. हा पदार्थ घरातील सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.