१० मिनिटांमध्ये घरीच बनवा बसस्टॅण्डवर मिळणारा आलेपाक
दैनंदिन आहारात वेगवेगळ्या पौष्टिक पदार्थांचे सेवन केले जातात. जेवणातील पदार्थ बनवताना आल्याचा वापर प्रामुख्याने केला जातो. आल्यामध्ये असलेले गुणकारी घटक शरीरासाठी अतिशय फायदेशीर ठरतात. सर्दी, खोकला किंवा आरोग्यासंबंधित इतरही समस्या उद्भवल्यानंतर आल्याचे सेवन केले जाते. आल्याचे सेवन केल्यामुळे शरीरात उष्णता निर्माण होते. याशिवाय शरीराची पचनक्रिया सुधारण्यासाठी आल्याचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला कोकणातील बसस्टॅण्डवर मिळणारा आलेपाक घरच्या घरी बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत. हा आलेपाक लहान मुलांसह मोठ्यांसुद्धा खूप जास्त आवडेल. शरीरात साचून राहिलेले विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यासाठी आल्याचे सेवन करावे. आलं खाल्यामुळे जळजळ आणि ऍसिडिटीची समस्या कमी होते. जाणून घ्या आलेपाक बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य: Pinterest)