
उन्हाळ्यातील उकाड्यावर रामबाण उपाय! थंडगार द्राक्षाचे सरबत घरीच बनवा आणि शरीरात टिकून राहील गारवा
कडक उन्हात बाहेर जाऊन आल्यानंतर प्रत्येकाला काहींना काही थंडगार पिण्याची इच्छा होते. कोल्ड्रिंक, सोडा किंवा बर्फाचा गोळा आवडीने खाल्ला जातो. पण सतत केमिकल युक्त अतिथंड्गार पेयांचे सेवन केल्यास पचनक्रियेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे घरी तयार केलेली सरबत प्यावी. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये द्राक्षाचे सरबत बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात द्राक्ष उपलब्ध असतात. द्राक्षांमध्ये असलेला नैसर्गिक गोडवा शरीरासाठी फायदेशीर आहे. मधुमेह किंवा आरोग्यासंबंधित इतर कोणत्याही समस्यांनी त्रस्त असलेले लोक द्राक्षांचे सरबत किंवा नुसतीच द्राक्ष सुद्धा खाऊ शकतात. यामुळे रक्तातील साखर संतुलित राहते. यामध्ये विटामिन सी, ए यांसारखे असंख्य विटामिन आढळून येतात. शरीराची कमकुवत झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी वाटीभर द्राक्षांचे सेवन करावे. अपचन, पोटात वाढलेला गॅस आणि पचनाच्या इतर सर्वच समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी द्राक्ष खाण्याचा सल्ला दिला जातो. द्राक्षाचे सरबत कमीत कमी साहित्यात झटपट तयार होते. चला तर जाणून घेऊया द्राक्षाचे सरबत बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
कोबीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर नाश्त्यात बनवा कुरकुरीत कोबीचे धिरडे, चवीला लागतील भारी