झटपट घरी बनवा चटकदार पेरूची चटणी
रोजच्या जेवणात किंवा डब्यासाठी नेहमीच काय भाजी बनवावी हे बऱ्याचदा सुचत नाही, कायमच कडधान्य आणि भाज्या खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं इच्छा होते. बऱ्याचदा लहान मुलांसह मोठेसुद्धा भाज्या खाण्यास नकार देतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये चटकदार पेरूची चटणी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. पेरू खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडतो. आठवडाभरातुन एकदा किंवा दोनदा पेरूचे सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे होतात. फायबर युक्त पेरूचे सेवन केल्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि शरीरातील घाण बाहेर पडून जाते. पेरूमध्ये विटामिन सी मोठ्या प्रमाणावर आढळून येते. त्यामुळे आठवड्यातून दोनदा पेरूचे आवश्यक सेवन करावे. यापूर्वी तुम्ही खोबऱ्याची चटणी, लसूण चटणी किंवा तिळाची चटणी खाल्ली असेल पण आज आम्ही तुम्हाला पेरूची चटणी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. कमीत कमी साहित्यात चटकदार पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास तुम्ही पेरूची आंबटगोड चटणी बनवू शकता. ही चटणी भाकरी, चपाती किंवा गरमागरम भातासोबत सुद्धा अतिशय सुंदर लागते. चला तर जाणून घेऊया चटकदार पेरूची चटणी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
Winter Special : थंडीच्या वातावरणात घरी बनवा पौष्टिक अन् कुरकुरीत ‘पालक वडे’; नोट करा रेसिपी