सकाळच्या नाश्त्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा परफेक्ट पालक-कॉर्न टोस्ट
सकाळच्या नाश्त्यात कायमः काय खावे? असे अनेक प्रश्न सगळ्यांचं पडतात. कांदापोहे, उपमा, शिरा, इडली, डोसा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये पालक कॉर्न टोस्ट बनवू शकता. पालक खाणे लहान मुलांना आवडत नाही. पालकची भाजी पाहून मुलं नाक मुरडतात. पालेभाज्या मुलांना खायला अजिबात आवडत नाहीत. त्यामुळे मुलांना कोणते ना कोणते पदार्थ बनवून खाण्यास द्यावेत. पालक कॉर्न टोस्ट बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. कमीत कमी साहित्यात आणि कमी वेळात पालक कॉर्न टोस्ट तयार होतो. सकाळी उठल्यानंतर कायमच पोटभर नाश्ता करणे आवश्यक आहे. नाश्ता केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. शरीरातील ऊर्जा कायम टिकवून ठेवण्यासाठीपालक कॉर्न टोस्ट तुम्ही खाऊ शकता. चला तर जाणून घेऊया पालक कॉर्न टोस्ट बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)






