पाहुण्यांच्या स्वागतासाठी १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत हरभरा कबाब, शाहाकारी लोकांसाठी उत्तम पर्याय
वाढदिवसाची पार्टी किंवा इतर कोणत्याही शुभ प्रसंगी पाहुण्यांना घरी बोलावले जाते. पाहुणे आल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. पार्टीमध्ये प्रामुख्याने चिकनपासून बनवलेले पदार्थ पाहायला मिळतात. पण शाहाकारी लोकांसाठी कोणता पदार्थ बनवावा, बऱ्याचदा सुचत नाही. अशावेळी तुम्ही हिरव्या वाटाण्यांपासून हरभरा कबाब बनवू शकता. हरभरा कबाब घरातील सगळ्यांचं खूप जास्त आवडेल. याशिवाय सकाळच्या नाश्त्यात सुद्धा तुम्ही हरभरा कबाब बनवू शकता. कमीत कमी साहित्यात झटपट पदार्थ बनवायला सगळ्यांचं खूप आवडते. थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात मोठ्या प्रमाणावर हिरवे वाटाणे उपलब्ध असतात. हिरव्या वाटाण्यांपासून अनेक वेगवेगळे चविष्ट आणि खमंग पदार्थ बनवले जातात. त्यामुळे घरी आलेल्या पाहुण्यांसाठी हरभरा कबाब नक्कीच बनवून पहा. तुम्ही बनवलेले कबाब खाऊन पाहुणे तुमचे कौतुक करतील. चला तर जाणून घेऊया हरभरा कबाब बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
कांदापोहे खाऊन कंटाळा आल्यास वाटीभर पोह्यांपासून झटपट बनवा कुरकुरीत पोह्यांचे नगेट्स, नोट करा रेसिपी






