
हेल्दी पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास सकाळच्या नाश्त्यात बनवा खमंग ज्वारीच्या पिठाचा ढोकळा
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं ढोकळा खायला खूप जास्त आवडतो. ढोकळ्याचे नाव ऐकल्यानंतर अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. ढोकळा हा गुजराती पदार्थ आहे. गुजरातमध्ये ढोकळा, फाफडा, चाट इत्यादी अनेक पदार्थ खूप जास्त फेमस आहे. जाळीदार मऊ ढोकळा बऱ्याचदा सकाळच्या नाश्त्यात किंवा संध्याकाळच्या वेळी भूक लागल्यानंतर खाल्ला जातो. आज आम्ही तुम्हाला ज्वारीच्या पिठाचा खमंग जाळीदार ढोकळा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. याआधी कायमच तुम्ही बेसन पिठाचा ढोकळा खाल्ला असेल. बेसन पिठाच्या सेवनामुळे शरीराची पचनक्रिया बिघडण्याची जास्त शक्यता असते. यामुळे अन्ननलिकेमध्ये पित्त तयार होण्याची शक्यता असते, ज्यामुळे सतत आंबट ढेकर येतात. त्यामुळे बेसन पिठाचा वापर करण्याऐवजी ज्वारीच्या पिठाचा वापर करावा. ज्वारीचे पीठ शरीरासाठी अतिशय प्रभावी ठरते. यामध्ये असलेले आवश्यक घटक शरीराला तात्काळ ऊर्जा देतात. तसेच हाडांचे आरोग्य सुधारते. चला तर जाणून घेऊया ज्वारीच्या पिठाचा ढोकळा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)