पारंपरिक पद्धतीमध्ये झटपट बनवा झणझणीत कांदा लसूण मसाला
उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर प्रत्येक घरातून भाजलेल्या मसाल्यांचा सुंदर सुगंध येऊ लागतो. कारण या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात मसाले तयार केले जातात. जेवणातील प्रत्येक पदार्थ बनवताना लाल तिखट मसाल्याचा वापर केला जातो. लाल तिखट मसाला, मालवणी मसाला, घाटी मसाला, आगरी कोळी मसाला इत्यादी अनेक मसाल्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत. पारंपरिक पद्धतीने बनवलेले मसाले चवीला अतिशय सुंदर आणि पदार्थांची चव वाढवणारे असतात. पदार्थाची चव वाढवण्यासाठी मसाल्यांमध्ये अनेक बारीक बारीक मसाल्यांचा वापर केला जातो. याशिवाय तयार करून घेतलेला मसाला वर्षभर व्यवस्थित टिकून राहावा, यासाठी योग्य ती काळजी घेतली जाते. जेवणाची चव वाढवण्यासाठी आणि पदार्थ झणझणीत तयार होण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. मात्र बऱ्याचदा पदार्थाला तेवढी चव लागत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला पारंपरिक पद्धतीमध्ये कांदालसूण मसाला कसा बनवावा, याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेला मसाला चवीला अतिशय सुंदर लागतो. जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
कडक उन्हाळ्यात घरी बनवा थंडगार कालाखट्टा सरबत, चव चाखून घरातील सगळेच करतील गोड कौतुक