
जेवणात तोंडी लावण्यासाठी १० मिनिटांमध्ये झटपट बनवा काठीयावाडी लसूण चटणी
रोजच्या जेवणाच्या ताटात कितीची चविष्ट आणि गोड पदार्थ असेल तरीसुद्धा काहींना झणझणीत तिखट पदार्थ लागतोच. राज्याच्या वेगवेगळ्या गावांमध्ये, जिल्ह्यांमध्ये पारंपरिक पद्धतीने चटणी बनवली जाते. खोबऱ्याची चटणी, मिरचीचा ठेचा, शेंगदाण्याची चटणी, लसूण चटणी इत्यादी अनेक वेगवेगळे पदार्थ वापरून चटणी बनवली जाते. जेवणाची चव वाढवण्यासाठी चटणी खाल्ली जाते. पण आज आम्ही तुम्हाला १० मिनिटांमध्ये काठियावाडी लसूण चटणी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. काठियावाडी चटणी पाहून तुमच्या सुद्धा तोंडाला पाणी सुटेल. लसूण चटणी तुम्ही गरमागरम भाकरी, चपाती किंवा वाफाळत्या भातासोबत सुद्धा खाऊ शकता. जेवणात भाजी खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास तुम्ही काठियावाडी लसूण चटणी बनवून खाऊ शकता. हा पदार्थ कमीत कमी साहित्य आणि वेळात झटपट तयार होतो. याशिवाय काठियावाडी पद्धतीमध्ये बनवलेली लसूण चटणी आठवडाभर व्यवस्थित टिकून राहते. चटणी लवकर खराब होत नाही. चला तर जाणून घेऊया रेसिपी. (फोटो सौजन्य – istock)
Sankashti Special : तेच तेच बोरिंग पदार्थ सोडा, यंदा उपवासाला बनवा टेस्टी बटाटा पॅटिस