दुपारच्या जेवणासाठी झटपट बनवा झणझणीत 'पनीर खिमा मसाला'
सुट्टीच्या दिवशी घरातील सर्वच कामे खूप आरामात असतात. जेवणात नेहमीच काय बनवावं हा प्रश्न घरातील प्रत्येक स्त्रीला कायमच पडतो. जेवणात पुलाव, बिर्याणी किंवा मांसाहारी पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांच खूप जास्त इच्छा होते. पनीरपासून कायमच पनीर टिक्का, पनीर बटर मसाला किंवा पनीर बिर्याणी बनवली जाते. पण नेहमीच तेच खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही जेवणात नवीन पदार्थ हवा असतो. अशावेळी तुम्ही झटपट पनीर खिमा मसाला बनवू शकता. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो. याशिवाय पनीरपासून बनवलेले पदार्थ घरातील सगळेच खूप जास्त आवडीने खातात. पनीर खिमा मसाला तुम्हाला गरमागरम चपाती किंवा बटर रोटी सोबत खाऊ शकता. मऊ पनीर आणि कांदा टोमॅटो, मसाल्यांचा वापर करून बनवलेला चविष्ट पदार्थ सगळ्यांचं खायला खूप जास्त आवडेल. चला तर जाणून घेऊया पनीर खिमा मसाला बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)






