
चहा कॉफी पिणे कायमचे जाल विसरून! सकाळच्या नाश्त्यात प्या गरमागरम पौष्टिक कुळीथ सूप
थंडीच्या दिवसांमध्ये आरोग्यासंबंधित बऱ्याच समस्या उद्भवू लागतात. कधी सर्दी तर कधी खोकल्यामुळे संपूर्ण आरोग्यावर बिघडून जाते. सतत होणाऱ्या सर्दी खोकल्यामुळे नाकातून पाणी येणे, नाक झोंबणे, नाकातून सर्दी येणे इत्यादी अनेक लक्षणे दिसू लागतात. याशिवाय थंडीच्या दिवसांमध्ये पोट जड होणे, पचनक्रिया बिघडणे इत्यादी समस्या वाढू लागतात. हिवाळ्यात सकाळ झाल्यानंतर सगळ्यात आधी चहा किंवा कॉफी प्यायली जाते. पण त्याऐवजी पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सकाळच्या नाश्त्यासाठी कुळीथ सूप बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. कुळीथ आरोग्यासाठी अतिशय गुणकारी असतात. यामध्ये असलेले गुणकारी घटक शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारतात आणि साथीच्या आजारांपासून शरीराचा बचाव करतात. चला तर जाणून घेऊया कुळीथ सूप बनवण्याची सोपी रेसिपी. (फोटो सौजन्य – istock)
Recipe : पश्चिम बंगालमधील फेमस पदार्थ, मसालेदार अन् कुरकुरीत असा ‘आलू चॉप’ तुम्ही कधी खाल्ला आहे का?