
जेवणासाठी करा चमचमीत बेत! हिरव्यागार मेथीच्या भाजीपासून बनवा लसूणी मेथी
जेवणाच्या ताटात प्रत्येकालाच काहींना काही चमचमीत पदार्थ खाण्यास हवा असतो. कायमच मशरूम, पनीर किंवा मिक्स भाज्या, कडधान्य खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. अशावेळी सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही लसूणी मेथी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात हिरव्यागार पालेभाज्या मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. पालेभाज्यांचे सेवन करणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर ठरते. या दिवसांमध्ये बाजारात मेथीची भाजी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असते. मेथीच्या भाजीचे पराठे, खोबऱ्याचा किस टाकून बनवलेली भाजी इत्यादी ठराविक पदार्थ कायम बनवले जातात. त्यामुळे संध्याकाळच्या जेवणासाठी किंवा डब्यासाठी लसूणी मेथी बनवू शकता. तुम्ही बनवलेला लसूणी मेथी घरातील सगळेच खूप जास्त आवडीने खातील. चला तर जाणून घेऊया लसूणी मेथी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)