१० मिनिटांमध्ये बनवा महागड्या हॉटेलमध्ये मिळणारे Lemon Coriander Soup, थंड वातावरणात घ्या पौष्टिक पदार्थ खाण्याचा आनंद
पावसाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर प्रत्येक घरात वेगवेगळ्या भाज्या आणि पदार्थांचा वापर करून सूप बनवले जाते. थंडगार वातवरणात पौष्टिक सूपचे सेवन केल्यास शरीराला सुद्धा अनेक फायदे होतात. त्यातील अतिशय चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ म्हणजे कोथिंबीर. हॉटेलमध्ये जेवायला गेल्यानंतर सगळ्यात आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे सूप. सूप प्यायल्यामुळे पोटात वाढलेली थंडी कमी होऊन शरीराचे तापमान नियंत्रणात राहते. पण नेहमीच हॉटेलमध्ये जाणून महागडे सूप पिण्याऐवजी घरी बनवलेले पौष्टिक सूप प्यावे. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये तयार होणारे लेमन कोरियांडर सूपबनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. संध्याकाळच्या वेळी सगळ्यांचं काहींना काही गरमागरम आणि पौष्टिक खाण्याची खूप जास्त इच्छा होते. अशावेळी विकतचे पदार्थ आणून खाण्यापेक्षा घरी बनवलेले हेल्दी पदार्थ खावेत. पावसाळ्यात किंवा थंड वातावरणात सूप प्यायला खूप मस्त वाटते. त्यामुळे पावसाचा आनंद घेताना सूप किंवा इतर गरम पदार्थ खायला सगळ्यांचं आवडतात. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – AI)






