पावसाळ्यात बनवा गरमागरम पारंपरिक पद्धतीमध्ये कुरडईची भाजी, विकतच्या नूडल्सपेक्षा चव लागेल भारी
राज्यासह संपूर्ण देशभरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे सगळीकडे थंड वातावरण झाले आहे. या दिवसांमध्ये सगळ्यांचं काहींना काही गरमागरम पदार्थ खाण्याची खूप जास्त इच्छा होते. कुरकुरीत कांदाभजी, बटाटा भजी यासोबतच विविध पारंपरिक पदार्थ सुद्धा बनवून खाल्लेले जातात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला मराठवाडा स्पेशल कुरडईची भाजी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो आणि चव सुद्धा भारी लागेल. कुरडई तेलात तळून खाल्ली जाते. पण मराठवाड्यातील काही भागांमध्ये कुरडईपासून भाजी सुद्धा बनवली जाते. रोजच्या जेवणात नेहमीच काय भाजी बनवावी, सुचत नसल्यास झटपट तुम्ही कुरडईची भाजी बनवू शकता. हा पदार्थ चपाती किंवा भाकरीसोबत खाल्ला जातो. चला तर जाणून घेऊया मराठवाडा स्पेशल कुरडईची भाजी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)






