Monsoon Tips : पावसाळ्यातील ओलाव्यामुळे चिवडा, चिप्स आणि इतर क्रिस्पी स्नॅक्स लवकर मऊ पडतात. मऊ झालेल्या या स्नॅक्सना फेकू नका तर सोप्या ट्रिकने घरीच त्यांना पुन्हा करकुरीत बनवा. यासाठी फक्त ३-४ मिनिटे लागतात.
मऊ झालेली नमकीन किंवा चिवडा फेकून देण्याची गरज नाही.
घरच्या घरी कोणत्या सोप्या ट्रिक्सने स्नॅक्स पुन्हा कुरकुरीत होतील, जाणून घ्या.
पावसाळ्यात वातावरणात ओलावा असतो ज्यामुळे क्रंची स्नॅक्स फार लवकर मऊ होऊ लागतात. चहासोबत किंवा घरी आलेल्या पाहुण्यांना सर्व्ह करण्यासाठी आपण टेस्टी, कुरकुरीत स्नॅक्स आणून ठेवतो पण चुकून याचे पॅकेट थोडे जरी खुले राहिले तर याची मजा निघून जाते. कुरकुरीत स्नॅक्स मऊ होतात ज्यामुळे अनेकजण त्यांना खाणं टाळतात. चिवडा, चिप्स किंवा चहात खाणारे बटर-टोस यासोबत ही समस्या उद्धवते. बऱ्याचदा लोक हे स्नॅक्स मऊ पडले की त्यांना फेकून देतात. परंतु स्नॅक्स फक्त मऊ झाले म्हणून त्यांना फेकून देण्याची गरज नाही. आम्ही तुम्हाला सांगतो की, ३ सोप्या टिप्सच्या मदतीने तुम्ही घरीच मऊ झालेल्या स्नॅक्सच्या पदार्थांना पुन्हा कुरकुरीत बनवू शकता. यामुळे तुमचे पैसेही वाया जाणार नाही आणि अन्नाचा अपव्यय देखील टाळता येईल. चला या ट्रिक्सविषयी जाणून घेऊया.