लालचुटुक लिचीपासून घरी बनवा आंबटगोड 'लिची जेली
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात लिची, चेरी इत्यादी हंगामी फळे उपलब्ध असतात. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं लिची खायला खूप जास्त आवडते. चवीला आंबटगोड असलेली लिची पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असते. फळांचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. लिचीमध्ये असलेला नैसर्गिक गोडवा, अँटीऑक्सिडंट्स, फायबर्स त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात. याशिवाय पचनक्रिया निरोगी ठेवतात. लिची खाल्यामुळे इम्युनिटी वाढण्यास मदत होते. लहान मुलांसाठी बऱ्याचदा बाजारातून जेली विकत आणली जाते. विकत मिळणारी जेली बनवताना अनेक हानिकारक पदार्थांचा वापर केला जातो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये आंबटगोड लिचीपासून जेली बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. तुम्ही बनवलेली जेली लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडते.(फोटो सौजन्य – pinterest)
Palak Paneer Recipe: चवीला मजेदार आणि पौष्टिक असा हॉटेलचा लोकप्रिय पदार्थ आता घरीच बनवा
पावसाळ्यात गरमागरम वाफाळत्या भातासोबत बनवा आंबट-गोड चवीचे वरण, थंडीत घ्या चविष्ट जेवणाचा आस्वाद