लोण्याचा वापर न करता १० मिनिटांमध्ये झटपट बनवा 'माखन मिश्रीचा' नैवेद्य
श्रावण महिन्यात अनेक सण समारंभ असतात. सणांचा महिना म्हणून श्रावण महिन्याची खास ओळख आहे. त्यातील सगळ्यांचा आवडता सण म्हणजे गोकुळाष्टमी. सर्वच घरांमध्ये गोकुळाष्टमीच्या तयारीला सुरुवात झाली आहे. यादिवशी लाडक्या श्री कृष्णाचे आवडते पदार्थ प्रत्येक घरात बनवले जातात. कृष्णाला लोणी खायला खूप जास्त आवडते. त्यामुळे प्रत्येक घरात माखन मिश्री बनवली जाते. याशिवाय इतरही वेगवेगळ्या पदार्थांचा नैवेद्य घरात बनवला जातो. पणधावपळीच्या जीवनशैलीमुळे आणि कामाच्या वाढलेल्या तणावामुळे जास्त वेळ मिळत नाही.तूप किंवा लोण्यापासून पदार्थ बनवताना जास्तीचा वेळ लागतो. अतिशय किचकट रेसिपी करण्याचा अनेक लोक कंटाळा करतात. अशावेळी मिठाईचे पदार्थ बाजारातून विकत आणले जातात. पण आज आम्ही तुम्हाला १० मिनिटांमध्ये माखन मिश्री बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेली माखन मिश्री चवीला अतिशय सुंदर लागते. चला तर जाणून घेऊया माखन मिश्री बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य: Pinterest)
Independence Day 2025 : स्वातंत्र्यदिनाचा दिवस होईल आणखीनच गोड, घरी बनवून तर पाहा तिरंगा कुल्फी