
रविवार होईल आणखीनच खास! दुपारच्या जेवणासाठी मालवणी पद्धतीमध्ये बनवा चिकन रस्सा
थंडीच्या दिवसांमध्ये वातावरणात सतत होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. सर्दी खोकला झाल्यानंतर सूप किंवा गरम गरम चिकन रस्सा प्यायला जातो. नेहमीच हॉटेलमधील पदार्थ आणून खाण्यापेक्षा घरी बनवलेले पदार्थ खावेत, ज्यामुळे शरीराला कोणतीही हानी पोहचणार नाही. सुट्टीच्या दिवशी प्रत्येक घरात चिकन, मटण किंवा मासे बनवला जातात. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे चिकन. चिकनपासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला मालवणी पद्धतीमध्ये चिकन रस्सा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा चिकन रस्सा घरातील सगळेच खूप आवडीने खातील. कोकणातील प्रत्येक घरात ओल्या खोबऱ्याचा वापर करून अनेक वेगवेगळे पौष्टिक आणि झणझणीत पदार्थ बनवले जातात. चिकन रस्सा तुम्ही वडे, भाकरी, चपाती किंवा भातासोबत सुद्धा खाऊ शकता. चला तर जाणून घेऊया मालवणी चिकन रस्सा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
बटाट्याची नाही यावेळी बाजरीच्या पिठाची बनवा कुरकुरीत आणि टेस्टी टिक्की, रेसिपी नोट करा