Make Tasty And Easy Bajra Tikki At Home Recipe In Marathi
बटाट्याची नाही यावेळी बाजरीच्या पिठाची बनवा कुरकुरीत आणि टेस्टी टिक्की, रेसिपी नोट करा
Bajra Tikki Recipe : बाजरीची भाकरी आपल्या आरोग्यासाठी खूप फायद्याची मानली जाते. पण तुम्ही कधी बाजरीची चवदार टिक्की खाल्ली आहे का? ही टिक्की तुम्ही संध्याकाळच्या स्नॅक्ससोबत खाऊ शकता.
फार कमी वेळेत ही टिक्की बनून तयार होते आणि संध्याकाळच्या नाश्त्यासाठी एक उत्तम पर्याय ठरते.
जर तुम्हाला स्ट्रीट फूड खायला आवडत असेल, तर बटाट्याची टिक्की तुमच्या आवडीच्या यादीत नक्कीच असेल. पण याच टिक्कीला जर थोडा हेल्दी आणि वेगळा ट्विस्ट दिला, तर? आज आपण बाजऱ्याची कुरकुरीत टिक्की कशी बनवायची ते पाहणार आहोत. बाजरा आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर धान्य असून त्यापासून बनलेली ही टिक्की चवीला तर छान लागतेच, शिवाय पोटभर आणि पौष्टिकही असते. कमी साहित्य आणि अगदी सोप्या स्टेप्समध्ये ही टिक्की फक्त अर्ध्या तासात तयार होते. चला तर मग बाजरीच्या पिठाची चवदार टिक्की कधी बनवायची याची एक सोपी रेसिपीजाणून घेऊया.
सर्वात आधी एका पॅनमध्ये अर्धा कप पाणी घ्या. त्यात गूळ घालून मध्यम आचेवर गरम करा. गूळ पूर्णपणे विरघळेपर्यंत ढवळत राहा. नंतर गॅस बंद करा.
एका मोठ्या भांड्यात बाजऱ्याचे पीठ घ्या. त्यात हळूहळू गुळाचे पाणी घालून मळायला सुरुवात करा. पीठ खूप घट्ट वाटत असेल, तर थोडेसे साधे पाणी घालू शकता.
हे पीठ साधारण 5 मिनिटे नीट मळा, जेणेकरून ते मऊ आणि लवचिक होईल.
आता पीठाच्या लहान-लहान गोळ्या करा. प्रत्येक गोळी हाताने हलकेच दाबून टिक्कीचा आकार द्या.
तयार टिक्क्यांवर वरून थोडेसे तीळ लावा आणि हलकेच दाबा, जेणेकरून तीळ टिक्क्यांना चिकटतील.
एका कढईत तेल गरम करा. तेल मध्यम गरम झाल्यावर टिक्क्या एक-एक करून टाका. दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत टिक्क्या उलट-सुलट करून तळा.
गरमागरम बाजऱ्याची टिक्की हिरव्या चटणीसोबत, चिंचेच्या चटणीसोबत किंवा आवडत्या लोणच्यासोबत सर्व्ह करा. ही टिक्की थंड झाल्यावरही चवीला छान लागते. तुम्ही ती एअरटाइट डब्यात साठवून ठेवू शकता.
पुढच्या वेळी बटाट्याच्या टिक्कीऐवजी ही बाजऱ्याची हेल्दी टिक्की नक्की करून पाहा. चव, कुरकुरीतपणा आणि पोषण यांचा परफेक्ट संगम तुम्हाला नक्की आवडेल.
Web Title: Make tasty and easy bajra tikki at home recipe in marathi